ताज्या घडामोडी

रविवारी मोफत हृदय रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिड टाऊन व कॉटनसिटीचा उपक्रम

AB7

रविवारी मोफत हृदय रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिरलॉयन्स क्लब ऑफ अकोला मिड टाऊन व कॉटनसिटीचा उपक्रम

 

अकोला : लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिड टाऊन व लॉयन्स क्लब अकोला कॉटनसिटी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई, जे. जे हॉस्पीटल मुंबई, सिटी हॉस्पीटल व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला, लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व स्पंदन मॅटर्निटी चाईल्ड हार्ट केअर हॉस्पिटल, अकोला व माऊली डायलिसीस अॅन्ड हार्ट केअर सेन्टर शेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने कैलाशचंद्र अग्रवाल सोनालावाला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, २३ फेब्रुवारी रोजी हृदय रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. येथील गोरक्षण रोड स्थित लोटस, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल येथे सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात येईल. यात एन्जिओप्लास्टी ए.एस.डी., व्हि.एस.डी., पी.डी.ए., मायट्रल स्टेनोसिस, सांधी वातापासून निर्माण झालेले झडपांचे रोग व झडपांचे (व्हॉल्व) व झडपांची कार्यप्रणाली तथा जन्मापासून पी.डी.ए. व मायट्रल स्टेनोसीस तसेच हृदयरोग रुग्णांची तपासणी करण्यात येईल. डॉ. अंबरिश खटोड, डॉ. तुषार चरखा, डॉ. विशाल काळे, डॉ. दीपक बोहरा हे रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार 2 डी इको काढून निवड झालेल्या रुग्णांवर सिटी हॉस्पीटल अकोला व माऊली डायलीसीस् अॅन्ड हार्ट केअर सेन्टर शेगांव व लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ८ व ९ मार्च, रोजी मुंबईचे डॉ. के. एन. भोसले शस्त्रक्रिया करतील व उर्वरित अवघड शस्त्रक्रिया मुंबई व इतर ठिकाणी करण्यात येईल. शिबिराला येताना रुग्णांनी आधारकार्ड, राशनकार्ड, मागील कादगपत्रे व रिपोर्ट आणावेत. अधिक माहिती साठी मो. ९८२२५६५९६६ वर संपर्क साधावा असे हार्ट सर्जरी कॅम्पचे प्रकल्प प्रमुख सुभाषचंद्र चांडक यांनी कळविले आहे. विशेष म्हणजे गत २८ वर्षापासून लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिड टाऊन हार्ट सर्जरी कॅम्पचे आयोजन करीत असून आजपर्यंत २१७९ रुग्णांना त्याचा लाभ मिळाला आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.