ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, माजी मंत्र्यांच्या उमेदवार कन्येचा तडकाफडकी पक्षाचा राजीनामा, सांगितली आतली गोष्ट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी सुरू होती. मात्र अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भाजप नेत्या आणि माजी खासदार हिना गावित यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. हिना गावित यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी आता भाजपचा राजीनामा देखील दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी खासदार तसेच राष्ट्रीय प्रवक्त्या हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षाच्या विविध पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.  बंडखोरीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. विजयकुमार गावित नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडे अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित यांनी महायुतीच्या विरोधातच बंडखोरी केली आहे. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हिना गावित यांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेर गावित यांनी स्वत: पक्षांच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे

आपल्या उमेदवारीमुळे पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून आपन राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं हिना गावित यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना शिंदे गट वारंवार भाजपच्या विरोधात काम करत आहे, म्हणून आपण त्यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचंही यावेळी गावित यांनी म्हटलं आहे. गावित यांच्या उमेदवारीमुळे आता या मतदारसंघात एक हायहोल्टेज लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.