महाराष्ट्र राज्य साप्ता ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीने प्रमोद पांडे सन्मानित
महाराष्ट्र राज्य साप्ता ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीने प्रमोद पांडे सन्मानित
अकोला – स्थानीक पंचायत समिती येथील सभागृहात आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य साप्ता ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीने मुकनायक दिनानिमित्त राज्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पी. टी. धांडे यांनी केले होते. या मेळाव्यात राज्यातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. अमोल रावणकर , महाराष्ट्र विजयचे संपादक विजय कुचे, यांच्यासह अनेक पाहुणे उपस्थित होते. यावेळी कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण अनेक विषयावर चांगले लिखाण करुन सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल ह्युमन राइट्सचे संपादक पत्रकार प्रमोद पांडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ऑनलाईन मिडीया जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शैलेष वानखडे यांनी अभिनंदन केले आहे.