राजकीय

राज्यात कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट, निकालातील या गोष्टी आश्चर्यकारक

निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचा राहिला. भाजपने १५२ जागा लढवल्या. त्यातील १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट ८७ टक्के राहिला. शिवसेनेने ८१ जागा लढवत ५७ जागा जिंकल्या. शिवसेनेचा स्ट्राईक रेट ७० टक्के राहिला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीने मोठे यश मिळवले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी निवडणुकीत डिस्टिंक्शन मार्क्स मिळवले आहे. परंतु महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नापास झाला आहे. त्यांना ३५ टक्केही मार्क मिळाले नाही. या निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्षाचा राहिला आहे. तसेच अजित पवार यांच्या पक्षाची मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत तिप्पट वाढली आहे.

अजित पवार यांची टक्केवारी वाढली

महाराष्ट्रातील निवडणूक निकाल आश्चार्यकारक आहे. सर्वाधिक धक्कादायक निकाल अजित पवार गटाचा आहे. अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. परंतु त्यांच्या मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत वाढून ९.०१ टक्के गेली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला ३.६० टक्के मते मिळाली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकीत ९.०१ टक्के मते मिळाली आहे.

अशी राहिली टक्केवारी

भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत.  २६.७७ टक्के मते मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यांना १२.३८ टक्के मिळाली आहे. काँग्रेसने १६ जागा जिंकल्या. काँग्रेसला १२.४२ टक्के मिळाली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २० जागा मिळाल्या. उद्धव सेनेला शिंदे सेनेपेक्षा कमी टक्केवारी मिळाली. त्यांना केवळ ९.९६ टक्के मते मिळाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ११.२८ टक्के मते मिळाली. त्यांनी १० जागा जिंकल्या.

कोणाचा किती स्ट्राईक रेट

निवडणुकीत सर्वाधिक  भाजपचा राहिला. भाजपने १५२ जागा लढवल्या. त्यातील १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट ८७ टक्के राहिला. शिवसेनेने ८१ जागा लढवत ५७ जागा जिंकल्या. शिवसेनेचा स्ट्राईक रेट ७० टक्के राहिला. राष्ट्रवादीने ५२ जागा लढवत ४१ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट ७८ टक्के राहिला.

पक्ष जागा लढवल्या जागा जिंकल्या स्ट्रईक रेट (टक्के)
भाजप 152 132 87.5
शिवसेना 81 57 70.3
राष्ट्रवादी 52 41 78.85
काँग्रेस 101 16 14.85
शिवसेेना उबाठा 96 20 20.83
राष्ट्र्वादी (शरद पवार) 87 10 11.49

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.