राजकीय

उद्धव ठाकरे संतापले, थेट मोदी, शाह, अजित पवार, फडणवीस, शिंदे यांच्यावर हल्ला

उद्धव ठाकरे सोमवारी प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यात होते. त्यांची वणी येथे जाहीर सभा होती. या सभेसाठी ते हेलिकॉप्टरने आले आहेत. यावेळी हेलिपॉडवर उतरताच उद्धव ठाकरे ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहायक मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली.

नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी झाली नव्हती. लोकसभा निवडणुकी दरम्यान नाशिकमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांच्या हातात जड बॅगा होत्या. त्याची तपासणी झाली नसल्यामुळे ‘नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस पडतोय’ असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होतो. आता विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी सोमवारी झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापले. प्रचार सभेतून त्यांनी थेट या विषयावर हात घालत भाजप आणि महायुतीवर हल्ला केला.

उद्धव ठाकरे सोमवारी प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यात होते. त्यांची वणी येथे जाहीर सभा होती. या सभेसाठी ते हेलिकॉप्टरने आले आहेत. यावेळी हेलिपॉडवर उतरताच उद्धव ठाकरे ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहायक मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संताप झाला. त्यांनी प्रचार सभेतून महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी वणी येथे दाखल झालो. त्यावेळी काही अधिकारी माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी म्हटले तुमची बॅग तपासायची आहे. मी त्यांना म्हणालो, तुमचे काम आहे, तपासून घ्या. पण माझी बॅग तपासली तशी कधी नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बॅग तपासली का? जे आपल्या बॅगा तपासत आहे, त्यांचेही खिसे तपासा हा मतदारांचा अधिकार आहे. आता तपास अधिकाऱ्याचे ओळख तपासा. त्यांना लोकसभा निवडणुकीत मिंदे यांच्या बॅग चालल्या होत्या.

वणीचा उमेदवार मशालीचा पाहिजे. महाविकास आघाडी निवडून आणायचे आहे. प्रत्येक ठिकाणी विजय दिला असे सांगत आहे. 20 तारखेला डोळ्यावर पट्टी ठेऊ नका. डोळस पणाने मतदान करा. मी माणसाला नाही यंत्रणेला दोष देत आहे.

पुढचे पाच वर्षे जीवनावश्यक भाव स्थिर राहील. मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. गुजरातला नेलेले वैभव महाराष्ट्रात परत आणणार आहे. आपले सरकार आल्यावर अदाणीला दिलेली जमिनी परत घेऊन परवडणारी घरे सर्वांना देणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.