महाराष्ट्रराजकीय

अजितदादांनी भाजपला पाठिंबा का दिला? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, बारामतीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या बारामतीमध्ये बोलत होत्या. नेहमीच आपली सभा मिशन स्कूलच्या पंटागणात होते, लोकसभेपासून एक नवीन प्रथा सुरू झाली पवार साहेबांनी भाषण केलं की ती जागा आपली. आपली प्रचाराची जागा अजित पवारांनी काढून घेतली,  त्यामुळे लोकसभेच्या प्रचाराची शेवटची सभा आपल्याला इथेच घ्यावी लागली, आणि आपण जिंकलो. सगळे तिकडे चालले असताना धैर्यशील दादा आमच्याकडे आले, धैर्यशील दादांची तुतारी नक्की वाजणार आहे, विधानसभेला सोलापुरात तुतारी जोरात वाजणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या पांडुरंगानं आपल्याला तुतारी दिली आहे. घड्याळाचा निकाल अजून कोर्टात आहे. अजित पवारांनी पक्ष, चिन्ह काढून घेतलं. हे निधीसाठी सोडून गेले नाहीत तर ईडीच्या भीतीनं तिकडे गेले असा घणाघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, काल टेक्सटाइल पार्कमध्ये तो प्रकार घडला, हे म्हणतात आम्हीचं सर्व केलं. बारामतीत साहेबांनी सगळं केलेलं हे सर्व विसरले. टेक्सटाइल पार्कमधील 50 टक्के युनिट बंद आहेत, साहेबांनी तर काहीच केलेलं नाही ना? असं म्हणत त्यांनी बारामतीच्या प्रचारसभेत जोरदार फटकेबाजी केली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.