अकोला येथील व्यापारी सुफियान हत्याकांड प्रकरणी १२ तासांत सहा आरोपींना अटक
AB7
अकोला येथील व्यापारी सुफियान हत्याकांड प्रकरणी १२ तासांत सहा आरोपींना अटक
अकोला दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी मलकापूर रेल्वे बोगद्याजवळ झालेल्या हल्ल्यात सुफ़ीयान खान याचा चाकूच्या वारांनी मृत्यू झाला तर साजिद खान गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके याच्या पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे ६ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये फैजान खान, अब्दुल अरबाज, शोएब अली यांना अकोल्यातून तर शेख अस्लम, सय्यद शहबाज आणि एक अल्पवयीन आरोपीला शेगाव येथून मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.फिर्यादी व त्याचे साथीदार सिगारेट सेवन करत असताना आरोपींना त्यांच्यासोबत मुलगी असल्याचा गैरसमज झाल्याने वाद होऊन मारामारीतून सुफ़ीयान खान याचा खून झाला असल्याचे तपासात उघड झाले. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व खदान पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.
